breaking-newsपुणेमहाराष्ट्र

येरवड्यात वकिलावर गोळीबार

पुण्यातील येरवडा येथे वकिलावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या गोळीबारात अॅड. देवानंद ढोकणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोरेगावमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अॅड. देवानंद ढोकणे हे सोमवारी रात्री काम संपवून कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले. रात्री पावणे नऊच्या सुमारास संगमवाडी येथे दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळी झाडली. यानंतर हल्लेखोर पसार झाले. या गोळीबारात जखमी झालेल्या ढोकणे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गोळीबारात ढोकणे यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे समजते. ढोकणे कुटुंबीयांकडून पोलीस माहिती घेत असून त्यांचे कोणाशी वैमनस्य होते का, याचा पोलीस तपास करत आहेत. गोळीबाराचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button