breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राजकीय दबावाखाली येऊन लोकप्रतिनिधींकडून कर्मचारी महिलेचा मानसिक छळ

  • लोकप्रतिनिधींचे आरोप बिनबुडाचे
  • कर्मचारी महिलेच्या तक्रारीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
  • कर्मचारी महिलेचे पती रोहित चतुर्वेदी यांचा आरोप

पिंपरी – महापालिकेच्या ई प्रभाग कार्यालयात कार्यरत मीटर निरीक्षक शितल चतुर्वेदी यांची राजकीय दबावामुळे चुकीच्या पध्दतीने बदली करण्यात आली. त्यासंदर्भात महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली. त्या तक्रारीची आयुक्त व प्रशासनामार्फत दखल घेऊन कार्यवाही होण्याअधीच काही राजकीय मंडळींनी पत्नी शितल चतुर्वेदी व माझ्यावर बिनबुडाचे आरोप करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. पत्नी शितल ह्या त्यांच्या मनमानी कारभारासाठी साथ देत नसल्यामुळे खोट्या तक्रारी करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप पती रोहित चतुर्वेदी यांनी गुरूवारी (दि. 19) पत्रकार परिषदेत केला आहे.

 

शितल चतुर्वेदी ई प्रभागात मीटर निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची भोसरीतील ई प्रभागातून थेट निगडीतील फ प्रभागात पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता आय्युब खान पठाण यांनी 8 जून 2018 रोजी बदली केली. या बदलीचे आदेश मिळाल्यानंतर त्यांना अशाप्रकारे तृतीय श्रेणीतील कर्मचा-यांची बदली करण्याचे अधिकार नाहीत. तसेच,  शितल चतुर्वेदी यांची बदली चुकीच्या पध्दतीने झाली आहे. या संदर्भात पुराव्यानिशी महापालिका आयुक्तांकडे शितल चतुर्वेदी यांनी 21 जून 2018 रोजी तक्रार केली आहे.

 

या तक्रारीवर आयुक्त व प्रशासनाकडून कार्यवाही होणे अपेक्षित होते. परंतु, तसे झालेले नाही. त्यासाठी 2 जुलै 2018 रोजी व नंतर 18 जुलै 2018 रोजी दोन स्मरणपत्रे देण्यात आली. त्यावर आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. चुकीच्या पध्दतीने बदली झाल्याची तक्रार महापालिका आयुक्तांकडे केल्यानंतर राजकीय मंडळींकडून पत्नी शितल चतुर्वेदी यांना त्रास देण्याचा उद्योग सुरू झाला. माझ्या व्यावसायाचा आधार घेऊन माझ्यावर देखील आरोप केले गेले. आपल्यावर झालेल्या आरोपांना कुठलाही आधार नसून ते बिनबुडाचे आहेत.

 

माझा मीटर विक्रीचा व्यवयाय अधिकृतपणे आहे. पत्नी शितल चतुर्वेदी यांचे पद व त्यांच्या अधिकार कक्षेत मीटर देणे हा विषय येत नाही. कुठेही संबध नसताना आणि पुरावे नसताना देखील केवळ पत्नीला व मला बदनाम करण्यासाठी हे खोटे आरोप केले गेले. या सगळ्यामुळे पत्नी शितल चतुर्वेदी यांना मानसिक तणावाखाली आहेत, असे रोहित चतुर्वेदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

बदलीबाबतचा खुलासा देण्यास प्रशासनाची टाळाटाळ

सन्मानीयांच्या आरोपांनंतर महानगरपालिका आयुक्त व पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता आय्युब खान पठाण यांच्याकडून या संदर्भात कार्यवाही करत शितल चतुर्वेदी यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्यावर शितल चतुर्वेदी यांनी 18 जुलै 2018 रोजी लेखी खुलासा देखील सादर केला. परंतु पठाण यांना शितल चतुर्वेदी यांच्या बदलीबाबत महापालिका प्रशासन विभागाकडून खुलासा मागितला होता. तो  त्यांनी अजून देखील दिेलेला नाही.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button