breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणे

येरवडा कारागृहातील कैद्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात सजा भोगत असलेल्या कैद्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातच त्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

सुनील प्रजापती (२५) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील प्रजापती याला धारवाड येथील एका खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली होती. काही महिन्यांपूर्वी आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात केली. सुनीलचे पंधरा दिवसांपूर्वी मानसिक संतुलन बिघडले होते.

त्यामुळे त्याला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सुनीलने अंगावर पांघरुण घेण्यासाठी देण्यात आलेली रझई फाडली आणि त्या रझईचा एक दोर केला. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा तपास येरवडा पोलीस करीत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button