breaking-newsराष्ट्रिय

महागाईचा भडका; घरगुती सिलिंडर महागला

सर्वसामान्य नागरिकांचा खिसा आता आणखी खाली होणार आहे, कारण तीन महिन्यानंतर घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. अनुदानित सिलिंडर दोन रुपये आठ पैशांनी महागलं आहे, तर विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात तब्बल ४२ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. नवे दर आजपासून लागू करण्यात येणार आहेत. सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला स्वयंपाकाच्या गॅस आणि विमानाच्या इंधनाच्या दरांचा आढावा घेतात

करात वाढ झाल्यानं हे दर वाढवल्याचं तेल कंपन्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये अनुदानित गॅस सिलेंडर ४९५ रुपये ६१ पैशांना मिळणार आहेत तर विनाअनुदानित सिलेंडर ७०१ रुपये ५० पैशांना मिळेल.

गेल्या दोन महिन्यात सिलिंडरच्या दरांमध्ये २८३ रूपये कपात झाली होती. आज नवे दर लागू करण्यात आले आहेत. नव्या दरांनुसार, मुंबईमध्ये अनुदानित सिलिंडरची किंमत ४९३.३२ रूपये झाली आहे. तर कोलकातामध्ये ४९८.७५ रूपये आणि चेन्नईमध्ये ४८३.४९ रूपये झाला आहे. विनाअनुदानित सिलिंडर मुंबईमध्ये ६७३.५० रूपये किंमतीत मिळणार आहे. तर कोलकातामध्ये ७२७.५० रूपये आणि चेन्नईमध्ये ७१७ रूपांना मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button