breaking-newsराष्ट्रिय

येडियुरप्पाचा आज शपथविधी?, सकाळीच राज्यपालांच्या भेटीसाठी रवाना

बंगळुरु : एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांचं सरकार पडल्यानंतर कर्नाटकातील घडामोडींना वेग आला आहे. भाजप नेते येडियुरप्पा (B S Yeddyurappa) आज मुख्यमंत्रिपदाची (Karnataka Chief Minister) शपथ घेण्याची शक्यता आहेत. येडियुरप्पा (B S Yeddyurappa) यांनी सकाळी दहाच्या सुमारास राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतली. आज संध्याकाळपर्यंत येडीयुरप्पा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची चिन्हं आहेत.

राज्यपालांच्या भेटीत येडियुरप्पा यांनी 105 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सोपवलं. तसंच आपल्याला विधीमंडळ नेते म्हणून निवडल्याचं सांगितलं.

सूत्रांच्या मते येडियुरप्पा आजच शपथविधी आटोपण्याच्या तयारीत आहेत. कारण ज्याप्रमाणे भाजपने बंडखोर आमदारांना आपल्याकडे खेचलं, तसंच काँग्रेस आणि जेडीएसही तीच खेळी करण्याची भीती त्यांना आहे.

जर आज शपथ ग्रहण सोहळा झाला तर येडियुरप्पाच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील यात शंका नाही. जर आजच शपथविधी घ्यायचा असेल तर त्यासाठीची आवश्यक तयारी राजभवानातून करण्यात आलेली नाही.

तीन आमदार निलंबित

कर्नाटकाच्या राजकारणाचा (Karnataka crisis) दुसरा अंक सुरु झालाय. काँग्रेसचे बंडखोर आमदार रमेश जारकीहोली आणि महेश कुमातल्ली यांचं निलंबन करण्यात आलंय. शिवाय अपक्ष आमदार आर. शंकर यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार (Karnataka speaker) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विशेष म्हणजे या तीन आमदारांचं निलंबन 2023 पर्यंत करण्यात आलंय. यामुळे कर्नाटकचं संकट (Karnataka crisis) आणखी वाढलंय.

भाजप सावध भूमिकेत

भाजपमधील सूत्रांच्या माहितीनुसार, राजीनामे स्वीकारले जात नाहीत तोपर्यंत सभागृहाची सदस्य संख्या 225 एवढीच असेल आणि यात एक नामांकीत सदस्यही आहे. बंडखोर आमदारही अजून सदस्य आहेत. त्यामुळे बहुमतासाठी 113 हा आकडा गाठणं गरजेचं आहे. दोन अपक्षांच्या पाठिंब्याने भाजपचं संख्याबळ 107 झालंय, जे बहुमतापेक्षा सहाने कमी आहे.

विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केल्यास सभागृहाची सदस्य संख्या 210 होईल, तर बहुमतासाठी 106 आमदारांची आवश्यकता असेल. एका अपक्षाला अपात्र घोषित केलं असलं तरी सध्या दुसऱ्या अपक्षासह भाजपला 106 हा आकडा गाठता येणं शक्य आहे. पण, विधानसभा अध्यक्षांनी जाणीवपूर्वक विलंब केल्यास राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली जाऊ शकते, अशी माहिती आहे.

विश्वासदर्शक ठराव

गेल्या दोन आठवड्यांपासूनच्या नाट्यमय घडामोडींनंतर कर्नाटकातील एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy) यांचं सरकार 23 जुलैला कोसळलं. विश्वासदर्शक ठरावावेळी कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी (HD Kumaraswamy) बहुमत सिद्ध करु शकले नाही. यामुळे कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळून भाजपचं सरकार येणं निश्चित झालंय. बहुमत चाचणीमध्ये सरकारच्या बाजूने फक्त 99 मतं तर विरोधात 105 मतं पडली.

कर्नाटक विधानसभा निवडणूक

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी गेल्या वर्षी निवडणुका झाल्या. या निवडणुकीत  भाजप 104, काँग्रेस 80 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. त्यात भाजप पहिल्या क्रमांचा पक्ष ठरला होता, मात्र काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.  इथे सत्ता स्थापनेसाठी 113 जागांची गरज आहे.

राज्यातील पक्षीय बलाबल

कर्नाटक विधानसभेत एकूण 225 जागा आहेत, तर एक नामांकित सदस्य आहे. बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस 80 जेडीएस 37, केपीजेपी 1, बसपा 1 आणि 1 अपक्ष अशा 120 आमदारांसह सध्या काँग्रेस-जेडीएसची सत्ता आहे. भाजपचे 104 आमदार निवडून आले होते. त्यामुळे भाजपला आणखी किमान दहा आमदारांची आवश्यकता आहे. आपल्याला 120 आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे सरकारला कोणताही धोका नसल्याचं कुमारस्वामींनी यापूर्वी म्हटलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button