क्रिकेट विश्वात आनंदाची बातमी! हार्दिक पांड्याच्या घरी पाळणा हलला, चिमुकल्याचं आगमन
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाबा झालेला आहे. हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविचने मुलाला जन्म दिला आहे. हार्दिकने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी दिलेली आहे. हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवर याबाबत एक पोस्ट केलेली आहे. यामध्ये त्याने एक फोटोही शेअर केला आहे. ‘आमच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालेलं’, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलेलं आहे.
We are blessed with our baby boy ❤️🙏🏾 pic.twitter.com/DN6s7aaZVE
— hardik pandya (@hardikpandya7) July 30, 2020
हार्दिक पांड्याने बाबा झाल्याचं सोशल मीडियावर सांगताच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. हार्दिकचे चाहते आणि टीम इंडियाच्या खेळाडूंनी त्याच्या आयुष्यातील या नव्या पाहुण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CA2khRLFsAz/?utm_source=ig_embed&ig_mid=40166074-DC49-4339-BCD0-075B9AB58087
हार्दिकला मुलगा झाल्याची माहिती मिळाल्यावर संघाचा कर्णधार विराट कोहलीने हार्दिक आणि नताशाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. ‘तुम्हा दोघांना शुभेच्छा’, अशी पोस्ट विराट कोहलीने केली आहे.