breaking-newsआंतरराष्टीय

युरेनियम शुद्धीकरण मर्यादा ओलांडण्याबाबत इराणला इशारा

इराण युरेनियम शुद्धीकरणाची कमाल मर्यादा ओलांडत असल्याबाबत अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर इशारा दिला आहे.

त्यांनी न्यूजर्सीतील मॉरिसटाऊन येथे वार्ताहरांना सांगितले की, इराणने सावध रहावे, त्यांनी एकाच कारणासाठी युरेनियमचे शुद्धीकरण चालवले आहे पण ते कारण कोणते हे मी सांगणार नाही, इराण जे करीत आहे ते चांगले लक्षण नाही, त्यामुळे त्यांनी असे करताना विचार करावा व काळजी घ्यावी.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी रविवारी असे म्हटले होते की इराणवर आता आणखी आर्थिक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय अणुकरारात घालून दिलेल्या कमाल युरेनियम शुद्धीकरण मर्यादेचे त्यांनी उल्लंघन चालवले असून अमेरिकेने या करारातून आधीच माघार घेतली आहे. इराणला युरेनियम शुद्धीकरणासाठी ३.६७  टक्क्य़ांची मर्यादा घालून देण्यात आली होती. अण्वस्त्र तयार करण्यासाठी ही शुद्धीकरण मर्यादा ९० टक्के असणे अपेक्षित असते.

अणुकरार वाचवण्यासाठी साठ दिवसांची मुदत

तेहरान: जागतिक समुदायातील देशांना जर इराणबरोबरचा अणुकरार वाचवायचा असेल तर त्यासाठी आता केवळ साठ दिवस युरोपीय देशांच्या हातात असून ही अखेरची संधी आहे असे इराणने स्पष्ट केले आहे .इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्बास मौसवी यांनी सोमवारी वार्ताहरांना सांगितले की, अणुकरार वाचवण्यासाठी सप्टेंबरनंतर मुदत वाढवता येणार नाही. इराणने आधीच युरेनियम शुद्धीकरणाची ठराविक मर्यादा ओलांडली असून युरेनियमचा साठा करणे सुरू केले आहे. युरोपीय देशांशी वाटाघाटींची अजूनही इराणची तयारी आहे. ते देश त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करतील अशी आशा आहे. अमेरिकेने या करारातून एक वर्षांपूर्वी एकतर्फी माघार घेतली होती. इराणने आंतरराष्ट्रीय करारात युरेनियम शुद्धीकरणासाठी घालून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button