breaking-newsराष्ट्रिय

‘तेजस एक्स्प्रेस’ ठरणार देशातली पहिली खासगी रेल्वे ?

केंद्र सरकारने मोठ्याप्रमाणात विरोध असुनही अखेर रेल्वेच्या खासगीकरणाकडे पाऊल टाकले आहे. दिल्ली आणि लखनऊ दरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी रेल्वे ठरणार आहे. रेल्वेने १०० दिवसांचे धोरण निश्चित करत सुरूवातीस दोन खासगी रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या खासगीकरणासाठी पावलं उचलण्याचं नक्की केलं आहे. खासगी तत्त्वावर चालणारी पहिली रेल्वे ही दिल्लीहून लखनऊ या ठिकाणी जाणारी तेजस एक्स्प्रेस ठरणार आहे. या रेल्वेसंबंधीचा प्रस्तावाचा अंतिम निर्णय १० जुलैपर्यंत घेतला जाईल.

रेल्वेने १०० दिवसांच्या अजेंड्याची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. सुरूवातीला देशात दोन खासगी रेल्वे चालवण्यात येतील अशी माहिती पीटीआयने दिली आहे. तेजस एक्स्प्रेसची २०१६ मध्ये सुरू करण्यात आली आहे. या एक्स्प्रेसचे नवे वेळापत्रकही नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाचा घाट घातला असला तरीही आमचा या निर्णयाला विरोध असेल असे नॅशनल फेडरेशन ऑफ इंडिय रेल्वेने म्हटले आहे. दरम्यान तेजस एक्स्प्रेस ही देशातली पहिली खासगी रेल्वे ठरणार असून ती ताशी २०० किमी वेगाने धावणारी रेल्वे आहे. या ट्रेनला स्वयंचलित प्लग असलेले दरवाजे आहेत. मेट्रोप्रमाणेच या रेल्वेचे दरवाजे आपोआप उघडतील आणि बंद होतील. अशी व्यवस्था असलेली ही पहिलीच रेल्वे आहे. तेजस असे या रेल्वेचे नाव असल्याने या रेल्वेच्या डब्यांना सूर्यकिरणांचा रंग देण्यात आला आहे. इतरही अनेक वैशिष्ट्ये असलेली ही रेल्वे आता देशातली पहिली खासगी रेल्वे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button