breaking-newsआंतरराष्टीय

बाह्य़ग्रहाची वातावरणीय रचना उलगडण्यात यश

पृथ्वी व नेपच्यून यांच्या मधल्या ग्रहांच्या आकाराच्या आपल्या ग्रहमालेबाहेरील दुसऱ्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या एका ग्रहाच्या वातावरणाची रासायनिक रचना उलगडण्यात यश आले आहे. त्यातून या ग्रहाचे स्वरूप व त्याची निर्मिती यावर प्रकाश पडणार आहे.

अमेरिकेच्या नासा या संशोधन संस्थेच्या स्पिटझर व हबल दुर्बीणींनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे. अशा प्रकारचा एकही ग्रह आपल्या सौरमालेत नाही, पण या प्रकारचे ग्रह इतर ताऱ्यांभोवती दिसून येतात असे नासाने म्हटले आहे.

ग्लिस ३४७० बी (जीजे ३४७० बी) हा ग्रह पृथ्वी व नेपच्यूनच्या मधल्या आकाराचा असून त्याचा खडकाळ गाभा हा हायड्रोजन व हेलियमच्या वातावरणात गुरफटलेला आहे. या ग्रहाचे वजन पृथ्वीपेक्षा जास्त तर नेपच्यूनपेक्षा  कमी आहे. असे अनेक ग्रह नासाच्या केप्लर  दुर्बीणीने शोधून काढले आहेत. २०१८ मध्ये या केपलर दुर्बीणीचे काम बंद झाले आहे. आपल्या दीर्घिकेतील ८० टक्के ग्रह हे या वस्तुमानाच्या टप्प्यात येतात. खगोलशास्त्रज्ञांच्या मते या ग्रहाच्या वातावरणाची रासायनिक रचना उलगडण्यात यश आले आहे. जीजे ३४७० बी या ग्रहाच्या वातावरणाचे घटक उलगडताना या ग्रहाचे स्वरूप व मूळ याबाबतही माहिती मिळत आहे. ग्रहांची निर्मिती कशी होते यावर या संशोधनातून प्रकाश पडणार आहे. हा ग्रह ताऱ्याच्या अगदी जवळून प्रदक्षिणा घालत असून तो गुरूच्या पेक्षा ३१८ पट जड आहे. कॅनडातील माँट्रियल विद्यापीठातील बिजोर्न बेनेक यांनी सांगितले की, तेथील वातावरण हे हायड्रोजन व हेलियमचे आहे. आपल्या सौरमालेतील ग्रहात असा प्रकार आढळून येत नाही. हबल व स्पिटझर दुर्बीणींनी जी ३४७० बी या ग्रहाच्या माध्यमातून प्रथमच वातावरणाचा अभ्यास केला आहे. यात ग्रहाची बारा अधिक्रमणे व २० ग्रहणे तपासण्यात आली होती. कुठल्याही ग्रहाची वर्णपंक्तीय वैशिष्टय़े प्रथमच शोधण्याची ही पहिली वेळ आहे.

या ग्रहावरील वातावरणात जड मूलद्रव्यांचा समावेश आहे. इतर बाह्य़ग्रह हे तप्त गुरूसारखे आहेत ते त्यांच्या ताऱ्याभोवती फार दूर अंतरावर तयार झाले व नंतर जवळ गेले. जीजे ३४७० बी हा ग्रह लाल बटू ताऱ्याभोवती जवळच्या अंतरावर तयार झाला. त्या ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या निम्मे आहे.

ग्रहाचे वेगळेपण

या ग्रहाचे वैशिष्टय़ म्हणजे तो गुरूसारखा मूळ ताऱ्यापासून दूर नाही शिवाय त्याच्यात ग्रहनिर्मिती वेळचा हायड्रोजन आहे त्यामुळे त्याचे हे वेगळेपण हे संशोधकांसाठी महत्त्वाचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button