breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

‘इंद्रायणी थडी’ चा लक्षवेधी ‘बिझनेस स्ट्रोक’; दोन दिवसांत तब्बल १.७५ कोटींची उलाढाल

आमदार महेश लांडगे यांच्या जत्रेला पुणे जिल्ह्यातील नागरिकांची पसंती

दोन दिवसांत २ लाख ५० हजारहून अधिक  नागरिकांची जत्रेला हजेरी

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

महाराष्ट्रातील ‘रेकॉर्ड ब्रेक’ जत्रा ‘इंद्रायणी थडी’ला दुसऱ्या दिवशी तब्बल २ लाख ५० हजाराहून अधिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. विशेष म्हणजे, जत्रेत दोन दिवसांत १ कोटी ७५ लाख रुपयांचा व्यवसाय झाला आहे. शेवटच्या दोन दिवसांत ही जत्रा व्यवसाय आणि गर्दीच्या बाबतीत राज्यात लक्षवेधी ठरणार आहे.

भोसरीचे आमदार तथा भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणाच्या हेतूने ‘इंद्रायणी थडी’ जत्रा भरविण्यात येते. शिवांजी सखी मंचने जत्रेच्या नियोजनात पुढाकार घेतला आहे. जत्रेतील एकूण ८०० स्टॉल्सपैकी ८० टक्के स्टॉल महिला बचतगटांना देण्यात आले आहेत. त्यामध्ये बचतगटांनी निर्माण केलेली उत्पादने नागरिकांना पहायला आणि खरेदी करायला मिळत आहे. तसेच, मनोरंजनाचे कार्यक्रम, खेळ यासह जनजागृती करणाऱ्या संस्था-संघटनांचे स्टॉल आहेत. खाद्यपदार्थ, प्रदर्शन, आरोग्य आणि प्रथमोपचार, ज्वेलरी, कपडे, फूटवेअर, नाविन्यपूर्ण वस्तू, घरगुती सौदर्य प्रसाधने आदी विविध स्टॉल या जत्रेत आहेत. यामध्यमातून पहिल्या दोन दिवसांत सुमारे १ कोटी ७५ लाख रुपयांची उलढाल जत्रेत झाली, अशी माहिती जत्रेचे समन्वयक संजय पटनी यांनी दिली.

****

दोन दिवसांत २ लाख ५० हजारहून अधिक नागरिकांची गर्दी…

विशेष म्हणजे, इंद्रायणी थडी जत्रा यंदा गर्दीचा उच्चांक गाठणार हे स्पष्ट झाले आहे. चार दिवस होणाऱ्या या जत्रेत पहिल्या दिवशी सुमारे ८५ हजार नागरिकांनी भेट दिली होती. दुसऱ्या दिवशी तब्बल १ लाख १८ हजार नागरिकांनी जत्रेला हजेरी लावली. त्यामुळे संयोजक आणि वाहतूक व पार्किंग व्यवस्थापन करणाऱ्या ‘टीम’ला चांगलेच सतर्क रहावे लागले. पहिल्या दिवशी उद्घाटन समारंभ, त्यानंतर ‘चला हवा येवू द्या’ हा प्रसिद्ध विनोदी कार्यक्रम झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भजन स्पर्धा, पारंपरिक नृत्यू स्पर्धा, ‘नव्याने जत्रा भरते’ असे दिमाखदार कार्यक्रम झाले. लावणी आणि लोकनृत्य स्पर्धेला श्रोत्यांनी तुफान गर्दी केली होती, असे शिवांजली सखी मंचच्या प्रमुख पुजा लांडगे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button