breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राज्यात एकत्र, गावात विरूद्ध राजकीय पक्ष; चंद्रकांत पाटलांच्या गावातच शिवसेना vs भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी

राज्यात सध्या महाविकास आगाडी सत्तेत आहे, तर भाजप विरोधी पक्षात आहे. पण येत्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यंदा एक आश्चर्याची गोष्ट घडताना दिसत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे गाव असलेले खानापूर निवडणुकीच्या आधीच चर्चेत आले आहे.

राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात खानापूर येथे चक्क शिवसेनेविरोधात भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हातमिळवणी केली आहे.

राज्यात जरी महाविकास आघाडीची सत्ता असली तरी, स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने खानापूर ग्रामपंचायतीसाठी झालेल्या या अनोख्या आघाडीची जोरदार चर्चा आहे.

भुदरगड तालुक्यातील खानापूर गावात सध्या भाजपची सत्ता आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख असलेले प्रवीण सावंत भाजपमध्ये गेले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते भाजपवासी झाले. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अजूनही काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळेच तेथील राजकीय समीकरणे कशी तयार होतात हे पाहणे औत्सुक्याचे होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button