breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

या दोन मतदार संघात विलासराव देशमुखांचा प्रभाव, सख्ख्या भावांचा विजय

पुणे : लातूरच्या देशमुख बंधूंनी आणि सोलापूरच्या शिंदे बंधूंनी विलासराव देशमुख यांचा वारसा सांगणारे त्यांचे दोन पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी यावेळी नशीब आजमावले.

अमित देशमुख यांची हॅटट्रिक
अमित देशमुख यांनी हॅटट्रिक साधत तब्ब्ल 40 हजार मतांची आघाडी घेत विजय खेचून आणला. त्यांनी भाजपाचे उमेदवार शैलेश लाहोटी यांचा पराभव केला. शैलेश लाहोटी यांना 68497 मतं पडलं.

धीरज पहिल्यांदाच विधानसभेत
तर धीरज देशमुख यांनी पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत लातूर ग्रामीणची जागा ऐनवेळी शिवसेनेच्या वाट्याला गेली आणि लढत सोपी झाली. जवळपास एक लाखांच्या विक्रमी मतांची लीड घेत धीरज देशमुख विजयी झाले आहेत. जिल्ह्यात काँग्रेसच्या दोन जागा आल्या आहेत, त्या दोन्ही जागा देशमुख बंधूंच्या रुपात आल्या आहेत हे विशेष.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button