breaking-newsआंतरराष्टीय

‘या’ देशातील हॉटेलमध्ये जेवणात असते चक्क सोने !

दुबई : दुबईत लोकं फक्त सोने घालत नाहीत तर ते खातातही ! दुबईतील बुर्ज अल अरब या प्रसिद्ध हॉटेलमध्ये लोकांना जेवणात चक्क सोने वाढले जाते! या हॉटेलमध्ये केक, कॉकटेल आणि कॅपेचिनो तसेच इतर खाद्यपदार्थांमध्येही सोने मिसळले जाते.

बुर्ज अल अरब हॉटेलचे इंटीरिअर असो किंवा इथले जेवण, सगळीकडेच सोन्याची पखरण केलेली असते. येथे १७९० स्क्वेअर मीटरची 24 कॅरेट गोल्ड लीफ लावलेली आहे. जेवणातही सोनं वाढले जात आहे. हॉटेलच्या २७ व्या मजल्यावर गोल्ड ऑन 27 नावाचे एक रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये कॉकटेलपासून कॅपेचिनोपर्यंत सगळ्यात सोनेच सोने दिसते.

हॉटेलच्या फूड आणि ब्रेव्हरेजेस डिपार्टमेंटचे मॅनेजर हारो सांगतात की ‘आलिशान राहणीमान दाखवण्यासाठी आम्ही खाद्यपदार्थात सोने वापरतो. यामुळे यश व प्रोत्साहनही मिळते. येथे लोकांची गर्दीही वाढू लागली आहे.’

गोल्ड ऑन २७ ची सर्वात प्रसिद्ध गोष्ट कॉकटेल एलिमेंट-79 आहे. या अल्कोहोल फ्री कॉकटेलमध्ये वाइनसोबत गोल्डन फ्लेक्स असतात. या पेयातील साखरेचे तुकडेही सोनेरी रंगाचे असतात. हारो सांगतात की ‘दर महिन्याला एक-दोन गेस्ट या हॉटेलमध्ये येतात ते सोन्याचे वर्ख असलेला केक ऑर्डर करतात. हॉटेलमध्ये दरवर्षी फूड आणि बेव्हरेजमध्ये दरवर्षी ७०० ग्राम जास्त सोन्याचा वापर केला जातो. हे हॉटेल खूप प्रसिद्ध होत आहे.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button