breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

भाजपला सत्ता गेल्याचे अतीव दु:ख – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर |महाईन्यूज|

‘सत्ता गेल्याचे इतके वाईट वाटते, हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करीत असलेल्या बेताल वक्तव्यांवरुन दिसूत येते. आमच्या पक्षातून आऊट गोईंग झालेले आणि ते पुन्हा भाजपमधून बाहेर पडू नयेत, म्हणून त्यांना अनेक आमिषे दाखविली जात आहेत. त्यांनी कितीही टोलेबाजी केली तरीही पाच वर्षात सत्ता बदल होणार नाही,’, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत लगावला.

उध्दव ठाकरे यांचे सरकार येत्या डिसेंबरमध्ये कोसळणार आहे, असे आरोप भाजपकडून केले जात आहे, त्याकडे लक्ष वेधले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सत्ता गेल्याचे दु: ख झाले आहे. या वैफल्यातून सरकारवर आरोप केले जात आहेत. त्यांना अधिक जागा मिळवूनही सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यांची राजकीय पिछेहाट झाल्याने त्यांचा तोल सुटला आहे. सत्ता नसल्यानेच अधूनमधून वेगवेगळी विधाने केली जातात. ते खुर्चीतून पडता पडता वाचले, असे ऐकले होते. विधानसभा निवडणूकीच्या वेळी आमच्या पक्षातून आऊटगोईंग झालेले आणि ते परत पुन्हा भाजपमधून बाहेर पडू नयेत, म्हणून पुन्हा सत्ता येणार असल्याचे आमिष दाखवित आहेत. मात्र पाच वर्षात कोणताही सत्ताबदल होणार नाही. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button