breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

या चार मतदारसंघामुळे शिवाजी आढळराव पाटलांच्या मंत्रीपदाची संधी हुकली

  • अमोल कोल्हेंच्या प्रचारापुढे चाणक्यनिती ठरली फेल

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  चाणक्य प्रशांत किशोर यांनी शिरुर लोकसभेतून खासदार शिवाजी आढळराव पाटील मोठ्या मताधिक्याने विजयी होती, असा दावा केला होता. प्रत्यक्षात तो दावा फोल ठरला असून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आढळराव पाटलांना जून्नर, आंबेगाव, खेड आणि शिरुरमुळे पराभवास सामोरे जावे लागले आहे. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून शिरूर लोकसभेसाठी उमेदवारी मिळवलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा 58,483 मतांनी पराभव केला. आढळराव पाटील निवडून आले असते तर केंद्रीय मंत्री मंडळामध्ये मंत्रीपदाची संधी मिळाली असती. परंतु, कोल्हे यांनी केलेल्या पराभवाने ही मंत्री पदाची संधीही हुकली आहे.

देशासह राज्यात शिवसेना-भाजप युतीने राज्यात घवघवीत यश मिळवलं, तरी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांचा पराभवाचा सामना करावा लागला आहे. पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा खासदार असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना स्वतःचा तालुका म्हणजे आंबेगाव तालुक्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांना 25697 मतांची आघाडी मिळाली. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना 107781 इतकी मते मिळाली, तर आढळराव पाटील यांना 82084 इतकी मते मिळाली. एकंदरीत पाहता होम पिचवर आढळराव हे पिछाडीवर गेले होते.

मागील निवडणुकीत खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात 61661 हजारांची आघाडी दिली होती. मात्र या वेळी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाने 7446 मतांची आघाडी अमोल कोल्हे यांनी मिळाली.

जुन्नर विधानसभा मतदारसंघातील स्थानिक उमेदवार असलेले अमोल कोल्हे यांना या मतदारसंघात सुमारे 41551 इतक्या मतांची आघाडी मिळाली. तर आढळराव पाटील यांना मतदारसंघात पिछाडी मिळाल्याने घात झाला. याच लोकसभेमधील शिरूर विधानसभा क्षेत्रात देखील शिवाजी आढळराव पाटील हे पिछाडीवर होते, तर अमोल कोल्हे हे 26305 मतांनी आघाडीवर होते.

या सर्व सहा विधानसभा मतदारसंघातून फक्त शहरी भागातील भोसरी विधानसभा क्षेत्रात अमोल कोल्हे हे 37077 इतक्या मताने पिछाडी वर होते. तर हडपसर विधनासभा क्षेत्राने आढळराव पाटील यांना 5370 मतांची आघाडी दिली. एकंदरीत पाहता सहा विधानसभा क्षेत्रांपैकी चार विधानसभा क्षेत्रांनी आढळराव पाटील यांचा पराभव झाला. तर भोसरी आणि हडपसर विधानसभा क्षेत्राने तारलं होतं. परंतु भोसरी, हडपसर शेवटच्या क्षणापर्यंत जुन्नर, आंबेगाब आणि शिरुर तालुक्याची आघाडी तोडू शकले नाहीत. यामुळेच आढळराव पाटील यांचा पराभव झाला.

उमेदवारांना मिळालेली मते

शिवाजीराव आढळराव पाटील

जुन्नर-71631

आंबेगाव-82084

खेड-92137

शिरूर-93732

भोसरी-125336

हडपसर-111082

टपाली मतदान -1345

एकूण 577347

अमोल कोल्हे

जुन्नर-113182

आंबेगाव-107781

खेड-99583

शिरूर-120037

भोसरी-88259

हडपसर-105712

टपाली मतदान-1276

एकूण-635830

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button