breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अबब… बँक मॅनेजरला घरी बोलावून पाय धुतले, आमदार सुरेश धस यांची गांधीगिरी

बीड: भाजप आमदार सुरेश धस यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आमदार सुरेश धस आष्टी येथील एसबीआय बँकेचे मॅनेजर हरी नारायण यांचे पाय धुताना दिसत आहेत. हरी नारायण यांनी पीक कर्जाच्या काही फाईल मंजूर केलेल्या नाहीत. त्यामुळे सुरेश धस यांनी बँक मॅनेजरला आपल्या बंगल्यावर बोलावून त्यांचे पाय धुतलेले आहेत.

यावेळी सुरेश धस यांनी बँक मॅनेजरवर फुलांचा वर्षांव करत खांद्यावर उपरणं ठेवलेलं आहे. सुरशे धस ‘मुन्नाभाई एमबीबीएम’ या चित्रपटाचं नाव घेत आपण गांधीगिरीने बँक मॅनेजरची समजूत घालत असल्याचे व्हिडीओत स्पष्ट करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचे मॅनेजर मिळावे, असं उपरोधिक वक्तव्य धस यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर आष्टीतील शेतकऱ्यांनीदेखील अशीच पूजा करावी, असंदेखील ते व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button