ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नातवाला मारल्याचा जाब विचारणा-या सासूवर जावयाकडून खुनी हल्ला

पिंपरी चिंचवड | जावयाने नातवाला मारले, याबाबत सासूने जावयाला जाब विचारला. या कारणाने चिडलेल्या जावयाने सासूला लोखंडी टॉमीने डोक्यावर आणि चेह-यावर प्रहार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी जावयाला ताब्यात घेतले आहे असून ही घटना बुधवारी (दि. 22) रात्री इंगवले चौक, पिंपळे निलख येथे घडली.शिवाजी संजय लोंढे उर्फ पप्या (रा. चौंधे चाळ, पिंपळे निलख) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी जावयाचे नाव आहे. सविता विकास धुताडमळ असे जखमी सासूचे नाव आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हेमा सोळंके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजी याने त्याच्या लहान मुलाला मारहाण केली. याबाबत शिवाजी याची सासू जखमी सविता यांनी त्याबाबत जाब विचारला. त्यावरून शिवाजी याने सासूला रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. ‘तुला खल्लास करून टाकतो’ म्हणत सासूच्या डोक्यात आणि चेह-यावर लोखंडी टॉमीने मारून खुनाचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सासू सविता गंभीर जखमी झाल्या आहेत. त्या बोलण्याच्या स्थितीत नसल्याने सरकारतर्फे फिर्याद देण्यात आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस आणखी तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button