breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

या कारणांमुळे पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अखेर कडक लॉकडाऊन जाहीर…

पुण्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पंधरा दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केलंय. आधी जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन १२ जुलै रोजी संपणार होता.मात्र आता १३ जुलैपासून पुण्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाउन वाढण्याची कारणं काय आहेत ते पाहुयात.

१) पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये काही लोक विनाकारण कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडत असल्याचं समोर आलं .

२) तर,काही लोक मास्क न घालताही वावरताना निदर्शनास आलं

३) पुण्यात आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढतच चाललेला आहे.

४) पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील रुग्णसंख्याही वाढली आहे

५) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही काही नागरिक लॉकडाऊनचे नियम पाळत नसल्याचं चित्र आहे

या पाच कारणांमुळेच लॉकडाउन वाढवण्याचा इशारा देण्यात आला होता. आता लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय अजित पवार यांनी जाहीर केला आहे. एकीकडे देशात अनलॉक दोन सुरु झालंय. दुसरीकडे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये मात्र लॉकडाउन पुन्हा करावा लागतो अशी स्थिती आहे.

दरम्यान पुणे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ३० हजारांकडे गेली आहे. तर आत्तापर्यंत ९०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान काही वेळापूर्वी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊन आणखी पंधरा दिवसांनी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button