breaking-newsपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये आढळले ब्रिटिशकालीन बॉम्ब, नागरिकांमध्ये खळबळ

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

चिंचवडगावात ब्रिटिशकालीन बॉम्ब सदृश वस्तू सापडल्या आहेत. शनिवारी (दि. 29) सकाळी सफाई कामगार महिला साफसफाई करताना या वस्तू आढळून आल्या आहेत. सोशल मीडियावर याचो फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, या बॉम्ब सदृश वस्तू ब्रिटिशकालीन निकामी बॉम्ब असल्याचे चिंचवड पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडगावातील वेताळ वस्तीत साफसफाई करत असताना एका महिलेला अडगळीत बॉम्बच्या आकाराच्या चार वस्तू दिसल्या. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. चिंचवड पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने पाहणी करून या चारही वस्तू ब्रिटिशकालीन निकामी बॉम्ब असल्याचे उघड करून सांगितले.

ब्रिटिशकालीन निकामी बॉम्ब असून त्यापासून कोणताही धोका नसला तरी हे बॉम्ब लोकवस्तीमध्ये कसे आले. भंगारमध्ये कुणी त्याची विक्री केली आहे का, अशा विविध मार्गाने चिंचवड पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान, हे ब्रिटिशकालीन निकामी बॉम्ब सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. माहिती मिळताच या परिसरात बॉम्ब बघण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली. चिंचवड पोलिसांनी चारही  ब्रिटिशकालीन निकामी बॉम्ब ताब्यात घेतले आहेत. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button