breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रिय

या कर्मचाऱ्यांना मे 2021 पर्यंत असणार Work From Home, कोरोना झाल्यास 28 दिवस मिळणार पगारी सुट्टी

नवी दिल्ली: येणाऱ्या काळात कोरोनाचे संकट कमी होण्याची अपेक्षा जरी केली जात असली, तरीही अद्याप सर्वकाही सुरळीत झाले नाही आहे. अनेक कर्मचारी ऑफिसमध्ये जाण्यास सुरुवात झाली आहे मात्र काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुरुच ठेवले आहे. प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने देखील त्यांच्या 12000 कर्मचाऱ्यांसाठी घरातून काम करण्याची सुविधा आणखी काही काळासाठी वाढवली आहे. आता हे कर्मचारी मे 2021 पर्यंत घरातूनच काम करतील. वॉलमार्टचा मालकी हक्क असणाऱ्या या कंपनीने सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता हा निर्णय घेतला आहे.

फ्लिपकार्टने त्यांना ‘बँक टू ऑफिस प्लॅन’ चा दुसरा टप्पा पुढील वर्षी मे पर्यंत थांबवलेला आहे. काही दिवसांपूर्व Amazon ने देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी WFH चा कालावधी जून 2021 पर्यंत वाढवलेला होता. फ्लिपकार्टच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही पूर्णपणे काम करताना, सहकार्य करताना आणि आशावादी राहण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करताना या काळात कोरोनाशी लढण्यासाठी खूप फ्लेक्झिबिलीटी दाखवली आहे. कर्मचाऱ्यांच्या सकारत्मकतेसाठी लीडरशीप टीमला खूप अभिमान वाटत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button