breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

रक्तदानातून भिमरायाला अभिवादन – रक्तदात्यांचे शतक

वाकड |

  • आरपीआय युवक आघाडी व कुणाल वाव्हळकर मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम

येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी व कुणाल वाव्हळकर मित्र परिवाराच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदानातून अभिवादन करण्यात आले. यावेळी शंभरहुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करीत शतक साजरे केले आहे.

आरपीआयचे (ए) प्रदेश महासचिव बाळासाहेब भागवत, शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, युवकाध्यक्ष कुणाल वाव्हळकर, नगरसेवक संदीप कस्पटे, उपमहाराष्ट्र केसरी विशाल कलाटे, अल्पसंख्याकचे ख्वाजाभाई शेख यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून भीम वंदनेनंतर रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला आहे.

आवश्य वाचा- चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला टाळलं, पण शरद पवारांवर सोडले टीकास्त्र

कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे ही बाब लक्षात घेऊन आपण ही समाजाच देण लागतो या सामाजिक भावनेतून कुणाल वाव्हळकर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. बाबासाहेबांना अनोखी आदारांजली वाहण्यासाठी तरूणांनी गर्दी केली होती. रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते तुळशीचे रोप व प्रशस्ती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला आहे.

विनोद चांदमारे, सुजित कांबळे, अमर भूमकर, शेखलाल नदाफ, साकी गायकवाड, सचिन अडागळे, महीला अध्यक्ष अनिता शिंदे, वरिष्ठ आघाडी अध्यक्ष तुकाराम मकासरे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रम यशस्वीतेसाठीअभिमान कलाटे, प्रसाद कस्पटे, सुरज भुजबळ मयुर जाधव, निलेश वाघमारे, राजेश बोबडे अनिता शिंदे, अविनाश शिरसाठ, विशाल वाव्हळकर यांनी परिश्रम घेतले. मोरया ब्लड बँक व त्यांच्या सर्व डॉकटर-कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहे.

आवश्य वाचा- धक्कादायक! सुरक्षा दल व पोलिसांवर दहशतवाद्यांचा हल्ला, जवान व नागरिक जखमी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button