breaking-newsमुंबई

विलेपार्लेत मांज्यामुळे बाईकस्वार तरुणाचा गळा चिरला; उपचारांदरम्यान मृत्यू

मकर संक्रातीच्या निमित्ताने आकाशात उडणाऱ्या पतंगीच्या माज्याने बाईकस्वाराचा गळा चिरल्याने २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना विलेपार्ले येथे काल (सोमवार) घडली. तसेच आज दुपारी दोन मुले घराच्या पत्र्यावर पतंग उडवत असताना तोल जाऊन खाली पडले. कांदिवली पूर्व परिसरात हनुमाननगर येथे ही घटना घडली.

शहरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच पतंग उडवताना पुरेशी काळजी घेण्यात न आल्याने काही अप्रिय घटना घडल्या आहेत. सोमवारी विलेपार्ले येथे नितेश पातारे (वय २९) या मोटारसायकलस्वाराचा मांजाने गळा चिरून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मंगळवारी दुपारी कांदिवली (पू.) येथील हनुमाननगर येथील जेतवन बुद्ध विहारासमोरील सोसायटीच्या पत्र्यावर चढून पतंग उडवणारा अभय राजभर ऊर्फ गोलू हा १२ वर्षीय मुलगा खाली पडून गंभीर जखमी झाला.

अभयला तातडीने डीएनए या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती खालावल्याने त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासले मात्र उपचारांपूर्वीच त्याला मृत जाहीर केले. या घटनेबरोबरच याच परिसरातील आणखी एक मुलगा पतंग उडवत असताना पडल्याची घटना घडली असून त्याच्यावरदेखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button