breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
‘या’ अभिनेत्रीने करोनापासून सुरुक्षित राहण्यासाठी घातला खास पोषाख
करोना व्हायरसने सध्या जगभरात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्माला आलेला हा विषाणू आता ९० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. या विषाणूला रोखण्यासाठी प्रत्येक देश आपापल्यापरीने प्रयत्न करत आहे. दरम्यान प्रसिद्ध गायक एरिका बाडू हिने करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे.
एरिकाने करोनापासून सुरुक्षित राहण्यासाठी एक खास पोषाख तयार करुन घेतला आहे. या करोनारोधक पोशाखाला ‘हॅजमत सूट’ असं म्हणतात. लुईस विटन नामक कंपनीने या सूटची निर्मिती केली आहे. ही कंपनी अत्यंत महागड्या वस्तूंसाठी ओळखली जाते. एरिका बाडूने ‘हॅजमत सूट’ घालून काढलेला एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
एरिका बाडू ही हॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायीका आहे. तिने ‘वॉट मॅन वॉट’, ‘हाऊस ऑफ डी’, ‘द लँड’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे.