breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरीच्या राष्ट्रवादी आमदाराचा भाजपला पाठिंबा?, महाविकास आघाडीच्या पाठिंबा पत्रावर अद्याप सही नाही

महाविकास आघाडीच्या 162 आमदारांची यादी आमच्या हाती

अजित पवाराचे मन वळवण्यात अपयश, राष्ट्रवादीचे तीन आमदार अजूनही तळ्यात मळ्यात

पुणे |महाईन्यूज|

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेसच्या महाविकास आघाडीच्या वतीने महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र देवून आमच्याकडे 162 आमदारांच्या सह्यांचं पत्र महाईन्यूज हाती लागलं आहे. या पत्रावर शिवसेनेच्या सर्व 56, काॅंग्रेसच्या सर्व 44 आणि राष्ट्रवादीच्या 54 पैकी 50 आमदारांच्या सह्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार समर्थक असलेल्या तीन आमदारांच्या अजूनही तळ्यात-मळ्यात सुरु आहे.

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीने एक पाऊल टाकत राज्यपाल कोश्यारी यांना पत्र दिले आहे. त्यात महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही 162 च्या आपली एकजूट दाखविली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठबळावर सरकार स्थापन करताना 170 आमदाराचे पाठबळ असल्याचा दावा केला होता. मात्र, सुप्रिम कोर्टाने उद्या (बुधवार) सायंकाळी 5 वाजेपर्यंत बहूमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, एकेकाळी पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. त्याला भाजपने सुरुंग लावत वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र, शिवसेनेच्या ताब्यात असलेला पिंपरी विधानसभा राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवले आहे. त्यात अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करुन उपमुख्यमंत्री पदाची शपथ केली. त्यामुळे पिंपरीचे आमदार आण्णा बनसोड हेही अजित पवाराचे समर्थक मानले जातात. त्यांनी महाविकास आघाडीच्या पाठिंबा पत्रावर सह्या न केल्याने भाजपला पाठिंबा दिल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button