breaking-newsआंतरराष्टीय

मुंबई हल्ल्यातील दोषींना पकडण्यासाठी अमेरिकेकडून ५० लाख डॉलर्सचे बक्षीस

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरही यातील दोषींवर कारवाई न होणे हा पीडितांचा अपमान आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार या हल्ल्याचे सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना शिक्षा देणे हे पाकिस्तानची जबाबदारी आहे, अशी मागणी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी केली आहे. तसेच या दोघांना पकडण्यासाठीच्या बक्षिसातही अमेरिकेकडून वाढ करण्यात आली असून ती ५० लाख डॉलर अर्थात ३५ कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे.

ANI

@ANI

On behalf of the government of the United States of America & all Americans, I express my solidarity with the people of India & the city of Mumbai on the 10th anniversary of the Mumbai terrorist attack: US Secretary of State Mike Pompeo

View image on Twitter

ANI

@ANI

The Department of State Rewards for Justice (RFJ) Program is offering a new reward for up to $5 million for information leading to the arrest or conviction of any individual who was involved in planning or facilitating 2008 Mumbai attack: US Secretary of State Mike Pompeo pic.twitter.com/5oN43VAJEz

View image on Twitter

६१ लोक याविषयी बोलत आहेत

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकले होते. या हल्ल्याला आज १० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी अमेरिकेच्यावतीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पोम्पिओ म्हणाले, मुंबई हल्ल्याच्या दशवर्षपूर्तीनिमित्त मी अमेरिका तसेच सर्व अमेरिकन नागरिकांच्यावतीने मुंबईकरांना बळ मिळावे अशी भावना व्यक्त करतो.

दरम्यान, मुंबई हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांची देशवासियांकडून प्रत्येक वर्षी आठवण काढली जाते. यावेळीही यानिमित्त मॅरेथॉनसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button