breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

…म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी संतापले

के. सी. पाडवी यांना पुन्हा घ्यायला लावली शपथ

मुंबई |महाईन्यूज|

ठाकरे मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळा आज (सोमवार) पार पडला. या सोहळ्यामध्ये नाट्यमय घटना घडली. शपथविधीवेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी संतापल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेसचे आमदार के. सी. पाडवी यांनी शपथ घेताना स्वत:चं मनोगत व्यक्त केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी संतप्त झाले. त्यांनी पाडवी यांना पुन्हा मंत्रिपदाची शपथ घ्यायला लावली.

राज्यपाल संतापले कारण, मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी एक नमुना ठरवण्यात आलेला असतो. शपथ घेताना त्यामधील मजकूर वाचणे अपेक्षित होते. मात्र, काँग्रेसचे अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार पाडवी यांनी शपथेच्या नमुन्याखेरीज स्वत:चं मनोगतही व्यक्त केलं. मात्र यावेळी राज्यपाल संतापले. त्यांनी पाडवी तिथेच समज दिला. आपल्याला देण्यात आलं आहे आहे तेच वाचावं. अनावश्यक वाचू नये, असं राज्यपाल म्हणाले.

पुढे बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, ‘माझ्यासमोर अनेक ज्येष्ठ नेते बसले आहेत. स्वत: शरद पवार आहेत. हवं तर त्यांना विचारा. त्यांना योग्य वाटत असेल तर माझी हरकत नाही,’ असंही राज्यपाल म्हणाले. यानंतर त्यांनी पाडवी यांना पुन्हा शपथ घ्यायला लावली. तेव्हा पाडवी यांनी परंपरेनुसार शपथ घेतली. शपथपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर पाडवी यांनी राज्यपालांची माफीही मागितली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button