breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ठाकरे मंत्रीमंडळ विस्तारात पिंपरी-चिंचवडसह मावळच्या पदरी निराशा

पिंपरी |महाईन्यूज|

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळ विस्तारात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडून पिंपरीच्या आमदाराला मंत्रीपद न मिळाल्याने कार्यकर्ते-पदाधिकारी नाराज झाल्याचे चित्र दिसत आहे.

महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात कोणाला स्थान मिळणार याची गेल्या आठवड्यापासून उत्सुकता लागून राहिली होती. गेल्या दोन दिवसात सुरू असलेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पिंपरी चिंचवड शहरावर अजित पवाराचे विशेष प्रेम आहे. तसेच भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने पिंपरीच्या आमदारांनी दादांसोबत कायम राहिले होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेसह मावळ लोकसभा निवडणुकीसह विधानसभा निवडणुकीत चिंचवड आणि भोसरीतून झालेल्या पराभवाने अजित पवारांचे शहरावरील प्रेम कमी होवू लागले आहे. शहरातील प्रश्नाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी-कर्मचा-याना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे काम अजित पवारांनी केले आहे.

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात मावळचे आमदार सुनिल शेळके, पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांनी संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण सोमवारी सकाळी राज्यपालांना सादर झालेली यादी प्रसिद्ध झाल्यावर मावळ, पिंपरी आमदाराचा समावेश नसल्याचे दिसून आले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. मंत्रीमंडळ विस्तारात पिंपरी चिंचवडकरांना आनंदापासून मुकावे लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button