breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

म्हणून मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढे यांची नागपूरला बदली केली

नागपूर | महाईन्यूज

नागपूर महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि आयुक्त यांच्यामध्ये कायमच धूसफूस आणि संघर्ष निर्माण व्हावा, यासाठीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेत बदली केली असावी, असा आरोप नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केले.

नागपूरच्या विकासासाठी आम्ही तुकाराम मुंढेंसोबत आहोत. विकासाच्या विरोधात असलेल्याशी संघर्ष होईल, अशी प्रतिक्रिया संदीप जोशी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

याआधी नागपूर महापालिका आयुक्तपदी अभिजित बांगर काम करत होते. महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर भाजपचा गड असलेल्या नागपूर महापालिकेत तुकाराम मुंढेंची बदली झाली आहे. मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. येत्या काळात भाजप आणि तुकाराम मुंढे यांच्यात संघर्षाची शक्यता नाकारता येत नाही.

येत्या दोन वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंढे यांची आयुक्तपदी बदली करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

तुकाराम मुंढे यांची कारकीर्द

तुकाराम मुढे यांची नागपूर जिल्हा परिषदेवर 2008 मध्ये सीईओ म्हणून नियुक्ती झाली. पदभार घेतलेल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी शाळेला भेटी दिल्या. दरम्यान, गैहजर शिक्षकांचं निलंबन केलं होतं. वैद्यकीय कारभारात अनियमितता दिसल्याने काही डॉक्टरांनाही निलंबित केलं होतं.

त्यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना तुकाराम मुंढेंनी वाळू माफियांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. पंढरपूर मंदिर समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री वगळता इतरांचं व्हीआयपी दर्शन त्यांनी बंद केलं होतं.

नवी मुंबईत महापालिकेतही त्यांनी कौतुकास्पद काम केलं. याठिकाणी बदली झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरु केली. तिथेच तुकाराम मुंढे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. त्यामुळे त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यात आला.

त्यानंतर मुंढे यांची पुण्यात पीएमपीएमएल अध्यक्षपदी बदली झाली. पुण्यात गेल्यानंतर त्यांनी तोट्यात असलेल्या पीएमपीएमएलचा महसूल वाढवण्यासाठी अनेक पाऊलं उचलली, नियम बदलले आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सुविधा दिल्या. पण, पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे त्यांची कारकीर्द पुन्हा एकदा चर्चेत आली.

पुण्यातून तुकाराम मुंढे यांची बदली नाशिकला करण्यात आली. पण एका वर्षाच्या आतच त्यांची मंत्रालयात बदली करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button