breaking-newsमनोरंजन

….म्हणून दीपिकानं मागितली चाहत्यांची माफी

चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘फिल्मफेअर पुरस्कार २०१९’ नुकताच पार पडला. या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार अभिनेत्री आलिया भट्टला मिळाला यामुळे दीपिकाचे अनेक चाहते नाराज झाले आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार हा दीपिकाला मिळावा अशी इच्छा दीपिकाच्या चाहत्यांची होती. मात्र या अपेक्षाभंगाबद्दल दीपिकानं चाहत्यांची जाहीर माफी मागितली आहे.

दीपिकाच्या एका फॅनपेजवर तिला ‘पद्मावत’साठी फिल्मफेअर न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (समीक्षक) पुरस्कार हा विभागून रणवीर आणि आयुषमानला देण्यात आला. मग हा पुरस्कार दीपिका आणि आलियाला का देण्यात आला नाही? असा सवाल या फॅनपेजवरून विचारण्यात आला आहे. या फॅनपेजवर दीपिकानं स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही, यासाठी मी तुमची माफी मागते. या क्षणापासून मी खूप मेहनत घेईन’ असंही ती म्हणाली.

दीपिकाचा ‘पद्मावत’ हा चित्रपट २०१८ मधल्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला होता. या चित्रपटातल्या दीपिकाच्या भूमिकेचं खूपच कौतुक झालं होतं. ‘पद्मावत’ मध्ये काम करणाऱ्या दीपिकाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या या सर्व धमक्यांना भीक न घालता तिनं राणी पद्मावतीच्या भूमिकेसाठी खूपच मेहनत घेतली होती. दीपिकाला या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला नसला तरी तिचा पती रणवीर सिंग याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

सध्या दीपिका तिच्या आगामी चित्रपटासाठी मेहनत घेत आहे. अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवलाच्या संघर्षकथेवर आधारित दीपिकाचा ‘छपाक’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून १० जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button