breaking-newsराष्ट्रिय

जम्मू बस स्थानकावर स्फोट, पोलीस घटनास्थळी दाखल

जम्मू बस स्थानकावर मोठा स्फोट झाला आहे. स्फोट होण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक माहितीनुसार, स्फोटात सहा जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी परिसर पूर्णपणे सील केला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चोख सुरक्षा व्यवस्था असतानाही स्फोट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

J&K: Blast at Jammu bus stand. Injured admitted to hospital. Area has been cordoned off by security personnel

114 people are talking about this

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे 41 जवान शहीद झाले होते. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक केला आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत चोख प्रत्युत्तर दिलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button