breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खराळवाडीत आठ वर्षाच्या मुलींवर मंदिरात बलात्कार

पिंपरी – खराळवाडीतील भागवत गीता मंदिरात खेळत असताना आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना पिंपरी चिंचवड शहरात उघडकीस आली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याला मोरवाडी न्यायालयात हजर केले असताना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.9) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला आहे. 

रोहन दिलीप भांडेकर (वय -18 रा. खराळवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादींची आठ वर्षांची पीडित मुलगी शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास खराळवाडी येथील भागवत गीता मंदिरात खेळत होती. आरोपीने तिला मंदिरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याबाबत सर्व घडलेला प्रकार पीडित मुलीच्या आईने सांगितला. आईने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेवून रविवारी (दि.10) पिंपरीमधून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गजानन कडाळे करित आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button