breaking-newsआंतरराष्टीय

मंगळ ग्रहासंबंधी समोर आली आली आणखी रोचक माहिती

वॉशिंग्टन : मंगळ ग्रह जीवसृष्टीसाठी एकेकाळी अनुकूल होता, असे महत्वाचे संशोधन समोर आले आहे. याबद्दल नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने माहिती दिली आहे. क्युरिऑसिटी या यानाने मंगळावरील तीन अब्ज वर्षांपूर्वीच्या एका दगडातून जैविक घटक शोधून काढले आहेत. तेथील एका विवरातील तलावात जीवसृष्टीला पोषक घटक होते, असे संशोधकांनी म्हटले आहे.

या जैविक घटकांत कार्बन आणि हायड्रोजन तसेच ऑक्सिजन, नायट्रोजन आणि अन्य काही घटकांचा समावेश होतो. पण, हे घटक सापडणे म्हणजे मंगळावर जीव अस्तित्वात होता, असे म्हणणे फार धाडसाचे ठरेल, असे नासाच्या मुख्य कार्यालयातील सायन्स मिशन डिरेक्टोरेट येथील थॉमस झर्बुचेन यांनी म्हटले आहे. पण, या नवीन माहितीमुळे आणखी शोध घेण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे झर्बुचेन यांनी म्हटले आहे. येत्या काळात या ग्रहावर आणखी महत्वाचे शोध लागतील, असेही झर्बुचेन यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button