breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन द्वारे “डॉक्टर आपल्या दारी “भारतीय जैन संघटना उपक्रम

पुणे | शांतिलालजी मुथा संस्थापक ,अध्यक्ष भारतीय जैन संघटना,यांच्या संकल्पनेने कोरोना विषाणु रोगाच्या पार्श्वभुमीवर भारतीय जैन संघटना , फोर्स मोटर्स ,आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे .या उपक्रमाचे उदघाटन पिंपरी चिंचवड महानगर पालिका महापौर उषाताई ढोरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा फडकावून 04 एप्रिल 2020 रोजी करण्यात आले .

या उपक्रमास उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळत असुन आता पर्यंत या उपक्रमात 7दिवसामध्ये 1111 रुग्णांची तपासणी करण्यात आली .कोरोना च्या पार्श्वभुमिवर लॉक डाऊन मुळे सर्वसामान्य जनतेस बाहेर पडणे शक्य नाही .डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमात सर्दी ,खोकला ,ताप ,असे साध्या आजाराची तपासणी करून त्यावर औषधे देखील दिली जातात .ज्या भागामध्ये ही व्हॅन जाते तेथे लाऊड स्पीकर द्वारे अनाउन्समेंट करून रुग्ण तपासणी साठी बोलावले जाते .

या उपक्रमासाठी पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डिकर ,प्रमुख वैद्यकीय अधिकारी पवन साळवे ,महिला वैद्यकीय अधिकारी डांगे मॅडम यांचे विशेष सहकार्य मिळाले. या उपक्रमासाठी भारतीय जैन संघटना जिल्हा अध्यक्ष विरेश छाजेड ,संदेश गादिया ,शुभम कटारिया,श्री संजय जाधव सर ,श्री.अशोक पवार हे विशेष परिश्रम घेत आहे . ज्या प्रभागात या व्हॅन द्वारे तपासणी करायची असेल तेथील सामाजीक संस्था,अथवा नगरसेवक यांनी भारतीय जैन संघटना पिंपरी चिंचवड अध्यक्ष विरेश छाजेड यांच्याशी मो .8379055759 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button