breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus | धारावीत कोरोनाचे आणखी ६ रूग्ण वाढले

मुंबई | कोरोनाचं सावट आता आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत घोंघावू लागलं आहे. यामुळे प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये आज आणखी ६ रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या २८ वर पोहोचली आहे. धारावीतील मुकूंदनगर इथं ५ तर राजीव गांधी नगरमध्ये १ रूग्ण मिळाला आहे. त्यामुळे धारावीत मुकूंदनगर हे हॉटस्पॉट ठरु लागलंय. या विभागात आतापर्यंत ९ रूग्ण मिळाले आहेत.

मुंबईतील वरळी, प्रभादेवी आणि धारावी या तीन ठिकाणी सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. कधीही न थांबणारी मुंबई आज ठप्प आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव येथे वाढत चालला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंता ही वाढल्या आहेत.

कोरोनामुळे आज मुंबईत १० जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ६५ वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची एकूण रूग्ण संख्या ९९३ वर पोहोचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button