breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

स्मृती मानधना ठरली ‘आयसीसी वुमेन ऑफ द इयर’

दुबई | टीम ऑनलाइन
भारतीय महिला संघाची स्टार ओपनर स्मृती मानधनने  २०२१ ची रिचेल फ्लिंट ट्रॉफी जिंकत आयीसी वुमेन्स क्रिकेटर ऑफ २०२१  चा पुरस्कार मिळवला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील ८ सामन्यांपैकी फक्त दोन सामने जिंकण्यात यश मिळवले होते. त्या दोन्ही सामन्यात स्मृती मानधनाने मोठी कामगिरी केली होती. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १५८ धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधाना ८० धावांची खेळी केली होती. तर मालिेळकेतील शेवटच्या टी २० सामन्यात स्मृती मानधनाने ४८ धावांची नाबाद खेळी केली होती.

याचबरोबर स्मृती मानधानाने  इंग्लंड  विरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या डावात ७८ धावांची खेळी केली होती. हा सामना अनिर्णित राहिला होता. याचबरोबर भारताने २०२१ मध्ये जिंकलेल्या एकमेव एकदिवसीय मालिकेत देखील तिने ४९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. होती. याचबरोबर स्मृती मानधानाने भारतीय महिला संघाच्या पहिल्या गुलाबी चेंडूवर (Pink Ball Test) खेळवल्या गेलेल्या सामन्यात शतक झळकावून इतिहास रचला होता. तिच्या १२७ धावांचा दमदार खेळीच्या जोरावर भारत मजबूत स्थितीत पोहचला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता. या सामन्यात स्मृती मानधनाला सर्वोकृष्ठ खेळाडूचा मानही मिळाला होता.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button