breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोफत लस सर्व भारतीयांना नाही, तर…; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लशीचं ड्राय रन सुरु झालं आहे. यातच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या कोरोना लसीच्यासंदर्भातील वक्तव्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. देशाचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी संपूर्ण देशभरात कोरोना लस मोफत देण्यात येणार असल्याचं म्हटलं होतं.

दिल्लीमध्ये पत्रकारांनी त्यांना दिल्लीप्रमाणं देशातील सर्व राज्यात कोरोना लस मोफत देणार का? असा सवाल केला असता डॉ हर्षवर्धन म्हणाले की, कोरोना लस दिल्लीतच नाही तर सर्व देशात मोफत दिली जाणार आहे.

मात्र या घोषणेनंतर काहीवेळाने डॉ हर्षवर्धन यांनी एक ट्वीट केलं. त्यात त्यांनी सांगितलं आहे की, 1 कोटी आरोग्य सेवक आणि 2 कोटी आघाडीचे कोरोना योद्धे यांनाच देशभरात कोविड प्रतिबंधक लस मिळणार आहे. जुलैपर्यंत उर्वरित 27 कोटी जनतेच्या लसीकरणाचा निर्णय घेतला जाणार आहे.

आज देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लशीचं ड्राय रन सुरु आहे. राज्यातील नागपूर, जालना, पुणे, नंदुरबारमध्ये हे ड्राय रन सुरु झालं आहे. या चारही जिल्ह्यात फ्रंटलाईन वर्कर्संना पहिल्यांदा कोरोनाची लस दिली गेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button