breaking-newsराष्ट्रिय
हैद्राबाद बलात्कार प्रकरण: महिलांनी पोलिसांना राखी बांधत केलं सेलिब्रेशन
हैदराबादमध्ये पोलिसांनी चकमकीदरम्यान सामूहिक बलात्काराच्या आरोपींना ठार केल्यानंतर सेलिब्रेशन केलं जात आहे. चकमक झालेल्या ठिकाणी लोक गर्दी करत असून पोलिसांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत आहेत. नागरिकांकडून पोलिसांवर फुलांचा वर्षाव करण्यात आल्यानंतर महिलांनी पोलिसांना राखी बांधत त्यांचे आभार मानले आहेत. याआधी नागरिकांनी ‘एसीपी जिंदाबाद, डीसीपी जिंदाबाद’ अशा घोषणाही दिल्या.