breaking-newsराष्ट्रिय

मोदींनी दिल्या राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या खास शुभेच्छांसह राहुल गांधी यांना आरोग्यदायी दीर्घायू लाभो अशी सदिच्छाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्षाकडूनही राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय संजय निरूपम, मिलिंद देवरा, नवीन जिंदाल आणि के सी वेणूगोपाल या काँग्रेसच्या नेत्यांनीही राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Narendra Modi

@narendramodi

Best wishes to Shri @RahulGandhi on his birthday. May he be blessed with good health and a long life.

Congress

@INCIndia

On Congress President @RahulGandhi‘s birthday, we look back at five moments when he inspired Indians everywhere. #HappyBirthdayRahulGandhi

लोकसभा निवडणूकीमध्ये अमेठी मतदारसंघात राहुल गांधी यांना पराभवाचा धक्का बसला होता. भाजपाच्या  स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला. मात्र वायनाड मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा वाढदिवस भव्य पद्धतीनं साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे. देशभरात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केक कापून राहुल गांधींचा ४९ वा वाढदिवस संस्मरणीय बनवण्याची योजना आखली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button