breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

SBI चे डेबिट कार्ड SMS च्या साह्याने ब्लॉक करता येत,पहा कसे ते…

कॅशपेक्षा एटीएम-डेबिट कार्ड द्वारे आजकाल सगळेच व्यवहार करतात. पण जर एटीएम-डेबिट कार्ड हरवलं काय कराव हे पटकन सुचत नाही…कारण कोणाच्या हाती लागलं तर अनेक गैरप्रकार होऊ शकतात…त्यामुळे ते कार्ड तात्काळ ब्लॉक करणे अत्यंत गरजेचे असते. कार्डचा इतर कोणीही वापर करू नये, यासाठी ते ब्लॉक करण्याची गरज असते.त्यावेळी एटीएम-डेबिट कार्ड ब्लॉक करण्यासाठी ग्राहकांना संबंधित बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधणे आवश्यक असते. ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातूनही कार्ड ब्लॉक करू शकतो …पण त्यापेक्षाही कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने कार्ड आपल्याला स्वत:ला ब्लॉक करता येत…ज्यामध्ये फक्त एसएमएस पाठवून आपण कार्ड ब्लॉक करू शकतो… 

स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय क्वीक ऍपच्या माध्यमातून मोफत एसएमएस पाठविण्याची सुविधा देते. या माध्यमातून ग्राहक स्टेट बँकेशी संबंधित वेगवेगळे व्यवहार सहजपणे करू शकतात. पण ऑफलाईन पद्धतीनेही एसएमएस पाठवून ग्राहक आपले एटीएम-डेबिट कार्ड ब्लॉक करू शकतात. ऑफलाईन पद्धतीने म्हणजे बँकेकडे नोंदणीकृत असलेल्या तुमच्या मोबाईलवरून पाठविलेला संदेशावरून आपण कार्ड ब्लॉक करू शकतो…

पाहुया कशी आहे पद्धत…

BLOCK<अंतर सोडा> कार्डचे शेवटचे चार क्रमांक टाईप करायचे. हा संदेश 567676 या क्रमांकावर पाठवावा…

बँकेकडे हा मेसेज पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून संबंधित मोबाईलवर कार्ड ब्लॉक केल्याचा संदेश पाठविला जातो.

या संदेशात कधीपासून कार्ड ब्लॉक झाले आहे त्याची वेळ आणि दिनांकही दिला जातो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button