breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: घर रिकामं करा, नाहीतर बलात्कार करू; सोसायटीच्या पदाधिकाऱ्याची डॉक्टरला धमकी

सध्या देशभरात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक डॉक्टर रूग्णांची सेवा करत आहे. यातच ओडिशातील भुवनेश्वरमधून एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. या ठिकाणी एका डॉक्टरवर आपलं घर रिकामं करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची माहिती समोर आली आहे. जर त्यांनी आपलं घर रिकामं केलं नाही तर बलात्कार करू अशी कथितरित्या धमकी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यानं दिली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, संबंधित महिला डॉक्टरनं याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

,दरम्यान, सोसाटीच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अनुप कुमार साहो यांनी दिली आहे. दरम्यान, सोसायटीकडूनही महिला डॉक्टरविरोधात काऊंटक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

आपण एक डॉक्टर आहोत आणि आपल्यामुळे सोसायटीत करोना पसरेल अशी भीती रहिवाशांना वाटत आहे. त्यामुळे आपल्याला घर रिकामं करायला सांगितलं जात आहे, असं महिला डॉक्टरनं एफआयआरमध्ये म्हटलं आहे, तर आपण घर रिकामं केलं नाही तर बलात्कार करण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या आठवडाभर ही धमकी आपल्याला देण्यात आली. काही वेळ आपण ते सहन केलं. परंतु नंतर बलात्काराची धमकी दिल्यानं भीतीपोटी पोलिसांत एफआयआर दाखल केल्याचं महिलेनं म्हटलं आहे.

“सध्या मी करोनाग्रस्त रूग्णांचे उपचार करत आहे. एकीकडे संपूर्ण देश डॉक्टरांच्या कामाची स्तुती करत आहे. तर दुसरीकडे आपल्या सोसाटीत आपल्याशी गैरवर्तन होत आहे. सोसाटीतील कोणताही रहिवासी आपली साथ देत नाही. त्यांना आपल्या कुटुंबीयांना करोनाची लागण होईल असं वाटत आहे. त्यांनी आम्ही आमचं घर सोडून जावं अशी इच्छा आहे,” असं त्या महिला डॉक्टरनं म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button