breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचा भुजबळांनी घेतला समाचार, म्हणाले…

मुंबई | महाईन्यूज

छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी’ या पुस्तकाविरोधात विविध स्तरांवरून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही छत्रपती शिवाजी महाराज आणि मोदींची तुलना करणाऱ्या या पुस्तकाचा खरपूस समाचार घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तुलना होऊच शकत नाही, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावलेला आहे.

‘आज के शिवाजी’ या पुस्तकावर जोरदार टीका करताना छगन भुजबळ म्हणाले की, ”छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन राज्य केलेले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि हे कुठे, छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तुलना होऊच शकत नाहीये. त्यामुळे अशा प्रकारच्या तुलनेमुळे शिवरायांवर प्रेम करणाऱ्या शिवप्रेमींना राग येणे व संतापाने साहजिकच आहे. अशा प्रकारची तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी’ या पुस्तकावर बंदी घातलेली पाहिजे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button