breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पक्षविरोधी निर्णय घेणाऱ्या अजित पवारांवर कारवाई करा : मोहिते पाटील

मुंबई | महाईन्यूज

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाविरोधी भूमिका घेत भाजपसोबत सरकार स्थापन केलेले होते. त्यानंतर देखील पक्षाकडून त्यांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान करण्यात आले आहे. मात्र आता अजित पवारांच्या त्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. स्थानिक पातळीवरील नेत्यांनाही मुभा द्यावी अन्यथा अजित पवारांवर कारवाई करावी, अशी मागणी जयसिंह मोहिते पाटील यांनी केलेली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेत मोहिते पाटील गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये मोहिते-पाटील कुटुंबातील दोन सदस्यांसह सहा सदस्यांचा समावेश आहे. या सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत भाजपला साथ दिलेली होती. या निलंबनावरून मोहिते पाटील गट आक्रमक झालेला आहे. आधी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कारवाई करा, मगच आम्हाला निलंबित करा, असा पावित्रा जयसिंह मोहिते पाटील यांनी घेतलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button