breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मेट्रोचे साहित्य कचऱ्यात!

कोथरूड परिसरातील लोकमान्य वसाहतीतील प्रकार

कोथरूड – वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे मेट्रोचे काम जलदगतीने सुरू आहे. परंतु पुण्यातील अधिकारी वर्ग कामामध्ये हलगर्जीपणा करत आहेत. पुणे मेट्रोच्या साहित्यावर लोकमान्य वसाहतीतील लोकांनी कचरा टाकला आहे.

लोकमान्य वसाहतीशेजारी असणाऱ्या पदपथावर पुणे मेट्रोचे साहित्य बेवारस स्थितीत पडले आहे. पौड रोड असल्या कारणाने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. पदपथावर चालणाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पादचाऱ्यांना रस्ता शोधावा लागेल, अशा पद्धतीने याठिकाणी साहित्य ठेवले आहे.

लोकमान्य वसाहत व न्यू लक्ष्मीनगर भागातील नागरिकांना यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पौड रस्त्यावरील दुचाकीस्वार यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या प्रकरणाकडे मात्र अधिकारी कानाडोळा करत आहेत.

या ठिकाणी नागरिकांना त्रास होत असेल तर प्रशासकीय अधिकारी वर्गाबरोबर बोलून हा प्रश्न लवकरच सोडवला जाईल आणि पदपथावर असलेले मेट्रोचे साहित्य व्यवस्थितरीत्या ठेवले जाईल.
– वेंकट राव, स्थापत्य व्यवस्थापक, महामेट्रो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button