breaking-newsआंतरराष्टीय

मृतावस्थेत आढळलेले ३९ जण चीनचे नागरिक

लंडन : ब्रिटनमध्ये शीतपेटीची व्यवस्था असलेल्या कंटेनरमध्ये ३९ जण मृतावस्थेत आढळले, ते सर्व जण चीनचे नागरिक असल्याचे गुरुवारी ब्रिटिश पोलिसांनी जाहीर केले. आठ महिला आणि ३१ पुरुषांची हत्या केल्याचा संशय असलेल्या आर्यलडमधील ट्रकचालकाची ब्रिटिश पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.

उत्तर आर्यलडमधील अधिकाऱ्यांनी तीन मालमत्तांवर छापे टाकले असून यामध्ये संघटित गुन्हेगारी गटांचा सहभाग आहे का, या दृष्टिकोनातून राष्ट्रीय गुन्हा अन्वेषण यंत्रणा काम करीत आहे. ट्रकचालक मो रॉबिन्सन (२५) याने आठ महिला आणि ३१ पुरुषांची हत्या केल्याच्या संशयावरून पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत.

कंटेनर बेल्जियममधून आला होता, मृतदेह  कंटेनरमध्ये कधी ठेवण्यात आले आणि हा प्रकार बेल्जियममध्ये घडला का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button