breaking-newsआंतरराष्टीय

मुस्लिम महिलांच्या वस्त्रांवर चिनी पोलीसांची कात्री

बीजिंग (चीन) – शिनजियांगमध्ये उईगर मुस्लिम महिलांच्या वस्त्रांवर चिनी पोलीसांची कात्री चालत असल्याची खबर आहे. शिनजियांगमध्ये चिनी पोलीस रस्त्याने जाणाऱ्या उईगर मुस्लिम महिलांची वस्त्रे कात्रीने कापत आहेत.

डीओएएम(डॉक्‍युमेंटिंग ऑपरेशन अगैन्स्ट मुस्लिम) नावाच्या संघटनेने म्हटले आहे, की मुस्लिम महिलांचे कपडे प्रमाणाबाहेर लांबीचे असल्याने चिनी पोलीस असे करत असावेत. मध्य एशियातील पूर्व तुर्कीस्तान हा ऐतिहासिक प्रदेश चीनच्या ताब्यात असून त्याला शिनजियांग असे नाव देण्यात आले आहे.

शिनजियांग प्रांतातील उईगर मुस्लिमांवर चीन अधिकाधिक कडक प्रतिबंध लागू करत आहे. काही दिवसांपूर्वी चीनने शिनजियांगमधील शाळकरी मुलांना कोणत्याही धार्मिक कार्यात भाग घेण्यास बंदी घातली होती. शिक्षण विभागाने जानेवारी महिन्यात काढलेल्या एका आदेशानुसार हिवाळी सुटीत मुलांना धार्मिक स्थळांमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली होती.

इस्लामी कट्टरपंथीयांवर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने चीनने उईगर मुस्लिमांना लांब दाढी ठेवण्यास आणि सार्वजनिक ठिकाणी बुरखा वापरण्यास बंदी घातली होती. मुस्लिमबहुल असलेल्या शिनजियांग प्रांतातून अनेकजण दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाल्याच्या बातम्या येत असतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button