breaking-newsमनोरंजन

दक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये ‘थलायवा’ रजनीकांतच सर्वाधिक लोकप्रिय

दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांची लोकप्रियता साऱ्यांनाच ठावूक आहे. रजनीकांत यांनी दाक्षिणात्य चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूडमध्ये देखील काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्यांचा चाहतावर्गही अफाट आहे. विशेष म्हणजे त्यांच्या याच लोकप्रियतेमुळे ते दाक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता ठरले आहेत.

‘स्कोर ट्रेंड्स इंडिया’च्या लोकप्रियता चार्टच्यानुसार, गेल्या सहा महिन्यांमध्ये रजनीकांत यांची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील थलायवा ठरले आहे. २०१८-१९ या वर्षामध्ये त्यांचे ‘काला’, ‘2.0’ आणि ‘पेटा’ हे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. हे चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीत उतरले असून यामुळेच त्यांच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली आहे.

वेबसाईट, ई-पेपर आणि व्हायरल न्युजमध्ये ५४४७ अंकांसह रजनीकांत बाकी दक्षिणात्य अभिनेत्यांहून अग्रेसर असल्याचेच समोर आले आहे. त्यातच गेल्या सहा महिन्यांमधल्या आकडेवारीनुसार, १०० पैकी १०० गुणांसह रजनीकांत लोकप्रियतेत अग्रणी असल्याचेच समोर आले आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.मल्याळम इंडस्ट्रीचा सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन या लोकप्रियतेच्या चार्टमध्ये ४२२३ गुणांसह दुस-या स्थानी आहे. १०० मधून ७७.५३ गुण मिळवून आपल्या चाहत्या वर्गाच्या प्रेमामुळे स्कोर ट्रेंड्सच्या लोकप्रियतेच्या चार्टवर पृथ्वीराज दुस-या क्रमांकावर आहे. ३८२९ गुणांसह बाहुबली फेम प्रभास लोकप्रियतेत तिस-या क्रमांकावर आहे. बाहुबलीनंतर प्रभासची लोकप्रियता दक्षिणमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही वाढलीय. त्यामुळेच १०० मधून ७०.३० गुणांसह तो तिस-या पदावर आहे.

आपल्या ‘महर्षी’ चित्रपटामुळे ३४८९ गुणांसह महेशबाबू चौथ्या स्थानी आहे. ‘महर्षी’मुळे जगभरात महेशबाबूच्या फॅनफॉलोविंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे ६४.०५ गुणांसह महेश बाबू चौथ्या स्थानी आहे.  सुपरस्टार मोहनलालच्या ‘लुसिफर’ आणि ‘ओडियन’ या दोन फिल्म्सनी चांगलीच लोकप्रियता मिळवली. म्हणूनच स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर ३२९४ गुणांसह मोहनलाल पाचव्या स्थानी आहेत. मोहनलाल यांच्या चाहतावर्गामुळे १०० पैकी ६०.४७ गुण मिळवून ते लोकप्रियतेत पाचव्या पदावर आहेत.

“प्रभास आणि महेश बाबू या दोघांचा फॅनफॉलोविंग प्रचंड आहे. सोशल प्लेटफॉर्म, न्यूज़पेपर आणि वायरल न्यूज़ रैंकिंगमध्ये ते चांगलेच लोकप्रिय आहेत. पण थलायवा रजनीकांत आणि सुपरस्टार मोहनलाल हे गेले कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यामुळेच लोकप्रियतेमध्ये त्यांना मागे टाकणं अशक्य होते”, असं स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button