breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुळशी पॅटर्न : स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पिस्तूल बाळगून फिरत होता तरुण…

पिंपरी / महाईन्यूज

मुळशी येथील एका गटासोबत भांडणे झाली म्हणून जवळ पिस्तूल बाळगणा-या व्यक्तीला देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे फॅक्टरी मेड बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. देहुरोड पोलीस ठाण्यातील नवनियुक्त पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी ही कारवाई केली आहे.

देहुरोड येथील साईनगर भागात बेकायदेशीररित्या एक व्यक्ती पिस्तुल बाळगून फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोंडे यांना मिळाली. त्यानुसार डीबी पथकातील कर्मचारी शाम शिंदे तसंच दादा जगताप यांना तत्काळ मार्गदर्शक सुचना देत संबंधीत व्यक्तीबाबत शोध घेण्यास रवाना करण्यात आले.

साईनगर मामुर्डी येथे पोलिसांना एक व्यक्ती संशयितरित्या फिरताना आढळून आला होता. त्याची विचार विचारपूस तसंच अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक फॅक्टरी मेड बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. संबंधित व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव अमोल अशोक कालेकर असं सांगितले.

त्याच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद गजेवार यांनी अधिक चौकशी केली असता, त्याने हे पिस्तुल मागील काही दिवसांपूर्वी मुळशी येथील तरुणांशी झालेल्या वादातून स्वतःचे आत्मसंरक्षण करण्यासाठी जवळ बाळगले असल्याचे सांगितले. तसंच पवनानगर येथील अमोल ज्ञानेश्वर दळवी या तरुणाकडून त्याने हे पिस्तुल घेतल्याचे सांगितले.

पोलिसांनी तात्काळ पिस्तुल देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता मावळ येथील पवनानगर येथून अमोल दळवी या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडूनही एक फॅक्टरी मेड बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतूस असा एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींवर यापूर्वीही एक गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी ‘झिरो टॉलरन्स’ या उपक्रमाअंतर्गत शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, आता देहूरोड शहरातील पोलीस ठाणे सक्रिय झाले असून शहरातील गुन्हेगारी कारवाया करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button