breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीने काळे झेंडे दाखवून फेकले गाजर

सोलापूर – जिल्हाधिकारी कार्यालयातील दुष्काळी आढावा बैठक संपवून सोलापूर विमानतळाकडे निघालेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला़ याचवेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांनी ताफ्याला काळे झेंडे दाखवित भाजप सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळ आढावा बैठकीसाठी सोलापूर दौºयावर होते़ सकाळी १० वाजता दुष्काळी आढावा बैठक, १२ वाजता महापालिकेच्या विकास कामांविषयी बैठक त्यानंतर १ वाजता कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली़ त्यानंतर पत्रकार परिषद आटोपून ते मुंबईला रवाना होण्यासाठी सोलापूर विमानतळाकडे मार्गस्थ झाले होते़ सोलापूर विमातनळ मार्गाकडे जाणाºया एका हॉटेलसमोर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवित मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला.

याचवेळी ताफ्यावर गाजर फेकत भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ताफ्यात घुसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यासाठी पोलिसांची चांगलीच धांदल उडाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button