breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबई विकास आराखड्याच्या इंग्रजी प्रतींची शिवसेनेकडून होळी

मुंबई – मुंबई विकास आराखड्याच्या प्रती इंग्रजीमध्ये प्रसिद्ध केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. मुबईतील कुर्ल्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विकास आराखड्याच्या इंग्रजी प्रतींची होळी करत निषेध नोंदविला. राज्य सरकारने मुंबईच्या विकास आराखड्याच्या प्रती इंग्रजीत छापून मराठीचा अपमान केला आहे. या प्रती मराठीमध्ये प्रसिद्ध करण्यात याव्यात अशी मागणीही यावेळी शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी केली आहे.

मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये राज्य सरकारने अनेक बदल केले आहेत. तसेच हा आराखडा मराठीऐवजी इंग्रजीत छापून सरकारने आपल्या भाषेचा अपमान केला आहे, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. विकास आराखड्याच्या इंग्रजी प्रतींना आमचा विरोध आहे. त्यामुळे सरकारने त्या मराठीत छापाव्या, अशी मागणीही करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनीसुद्धा या विरोधात आंदोलन करा, असे आदेश देत पाठिंबा दिला आहे.
मुंबईचा रखडलेला विकास आराखडा 26 एप्रिल रोजी मंजूर करण्यात आला. शहरात परवडणाऱ्या घरासाठी आतापर्यंतची सर्वाधिक जागा खुली करण्यात येणार आहे. तर 80 लाख जणांना रोजगाराच्या संधीचे उद्दिष्ट्य ठेवून कमर्शियल एफएसआय वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मुंबईची आर्थिक राजधानी असलेली ओळख अबाधित राहणार असली तरी शहरातली गर्दी दुप्पट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button