breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबई मनपाकडून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी कामाचं नवं वेळापत्रक

मुंबई | मुंबई महापालिका प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडून डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी कामाचं नवं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या नव्या वेळापत्रकानुसार कर्मचाऱ्यांना पाच दिवस काम आणि दोन दिवस सुट्टी असेल. तसंच रुग्णालयाजवळच त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यापूर्वी महापालिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तीन दिवस काम आणि एक दिवस सुट्टी देण्यात येत होती.

कोरोनावर मात करण्यासाठी महापालिका, आरोग्य विभागातील कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस अविरत काम करत आहेत. या कोरोना योद्धांसाठी आता आठवड्यातून पाच दिवस काम तर नंतरचे दोन दिवस सुट्टी अशाप्रकारचे वेळापत्रक आखले आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था रुग्णालयाजवळील करण्याचा निर्णय घेतल्याने आरोग्य विभागातील शेकडो कामगारांचा ताण कमी होणार आहे. दरम्यान, प्रशासनिक काम करणाऱ्या किंवा सुपरव्हिजन करणाऱ्या सीनियर डॉक्टरांसाठी ही सुविधा लागू राहणार नाही, असंही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button